‘शेतकऱ्याचा असूड’ हे पुस्तक अनेक दृष्टींनी वैशिष्ट्यपूर्ण आहे. शेतकऱ्याच्या निमित्ताने जोतीरावांनी एकूण तत्कालीन ग्रामीण महाराष्ट्राचेच वास्तव चित्र रेखाटलेय! 

या पुस्तकाबाबत दुर्गा भागवत म्हणतात, “महात्मा फुल्यांनी येथल्या शेतकऱ्याची दयनीय अवस्था पाहून साधारण १८८० वगैरेच्या दरम्यान हे पुस्तक लिहिले. त्यांच्या काळात अन्य कुणाला शेतकऱ्यांच्या हालअपेष्टांवर पुस्तक लिहिणे सुचू नये, यातच फुल्यांचा मोठेपणा स्पष्ट होतो. त्यांनी इतरही अनेक परोपकाराची आणि आणि लोकहिताची कामे केली. ती केली नसती तरी ‘शेतकऱ्याचा असूड’ या एकाच पुस्तकानेही त्यांचे मोठेपण सिद्ध झाले असते.”.......